मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस खांदेरी' ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'आयएनएस खांदेरी'चं जलावतरण करण्यात आलं. 'आयएनएस खांदेरी' नौसेनेच्या ताफ्यात दाखल झाल्याने नोसैनेची ताकद आणखी वाढली आहे.
शत्रूला पहिल्यापेक्षा मोठा झटका देण्यास भारत सक्षम आहे. आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढली आहे. गरज पडल्यास 'आयएनएस खांदेरी' पाकिस्तानच्या हल्ल्यास सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे, हे पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, जो स्वत:ची पाणबुडी बनवण्यात सक्षम आहे, याचा मला अभिमान वाटतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
याअगोदर या प्रकारातील पहिली पाणबुडी आयएनएस कलावरी चार वर्षांपूर्वी मुंबईत नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. तर आता आयएनएस खंदेरीचा देखील मुंबईत नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. आएनएस खंदेरी ही दुसऱ्या श्रेणीतील कलावरी सबमरीन म्हणजेच पाणबुडी आहे.
आयएनएस खांदेरीची वैशिष्ट्य
आयएनएस खांदेरी पाणबुडीची लांबी 67.5 मीटर आणि उंची 12.3 मीटर इतकी आहे. या पाणबुडीचं वजन एक हजार 565 टन इतकं आहे. ही पाणबुडी तब्बल 45 दिवस पाण्यात राहू शकते. आयएनएस खंदेरी 350 मीटर खोल समुद्रात जाऊन शत्रूची माहिती मिळवू शकते. या पाणबुडीचा वेग 22 नोट्स म्हणजेच 40 किलोमीटर प्रतितास इतका
- PHOTO GALLERY | नौदलाचं बळ वाढणार, आयएनएस खंदेरी पाणबुडीचा ताफ्यात समावेश