INS Kadamba कारवार : कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार किनारपट्टीवर (INS Kadamba) बुधवारी दुपारच्या सुमारास एक स्थलांतरित समुद्री पक्षी आढळून आलाय. या पक्षाच्या अंगावर चिनी बनावटीचे जीपीएस ट्रॅकर (GPS Tracker) उपकरण बसविण्यात आलेले होते. भारतीय नौदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘आयएनएस कदंब’ तळाजवळ हा पक्षी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय.
दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलिसांसह (Police) वन विभाग (forest department) आणि नौदल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने चौकशी (Naval Administration Investigation) सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतावर हेरगिरी करण्याचा कोण प्रयत्न करतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कारवारच्या नौदल तळावर चीनची नजर आहे का? असा प्रश्नही या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून त्या दृष्टीने आता पाऊले उचलली जात आहे.
INS Kadamba : नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवारच्या किनारपट्टीवर बुधवारी दुपारच्या सुमारास एक पक्षी जखमी अवस्थेत पडून होता. त्याच्या पाठीवर जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसविण्यात आलेले होते. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याला वनविभागाकडे सुपूर्त केले. वन अधिकाऱ्यांनी पक्ष्याच्या अंगावर लावलेले उपकरण तपासले असता, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक युनिट आणि लहान सोलर पॅनल असल्याचे आढळून आले.
Karwar News : उपकरणावरील चिठ्ठीवर ई-मेल
धक्कादायक बाब म्हणजे, या पक्षाच्या अंगावर बसविण्यात आलेल्या उपकरणाला एक चिठ्ठी जोडलेली होती, ज्यावर एक ई-मेल आयडी लिहिलेला होता. सदरील पक्षी कुणालाही सापडल्यास त्याने दिलेल्या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत नमूद केलेला होता. पोलिसांनी या ई-मेलची तपासणी केली असता, तो बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस (CAS) अंतर्गत असलेल्या रिसर्च सेंटर फॉर इको-एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस या संस्थेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आणखी वाचा