नवी दिल्ली : कारचोरीमुळे महाराष्ट्रच नाही, देशभरातील सर्वसामान्य वाहनचालक त्रासलेले आहेत. मात्र याची झळ केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या पीएला बसली आहे. गडकरींच्या पीएच्या घरासमोरुन इनोव्हा कार चोरीला गेली आहे.


नितीन गडकरींचे पीए मनोज वाडेकर यांच्या घरासमोरुन भाड्यावर घेतलेली कार चोरीला गेली. चोरीला गेलेल्या इनोव्हाचा क्रमांक DL10C E 8122 आहे. पंडारा रोडसारख्या दिल्लीतल्या उच्चभ्रू परिसरातून गाडीचोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चालकाने नेहमीप्रमाणे इनोव्हा कार वाडेकर यांच्या घराबाहेर पार्क केली होती. त्यानंतर सकाळच्या वेळेत कार चोरीला गेल्याची माहिती आहे. कारमालक आणि चालकाने टिळक मार्ग पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.