नवी दिल्ली : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता दुप्पट होणार आहे. पगारवाढीसंबंधी इन्फोसिस प्रशासन विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सतत कंपनी सोडून जाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी इन्फोसिसने हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे.
इन्फोसिस भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी सेवा असून, आयटी व्यावसायिकांची सर्वात मोठी भरती करणारी कंपनी सुद्धा आहे. दुप्पट पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट प्रक्रिया पार करावी लागेल. त्यात कर्मचारी यशस्वी ठरल्यानंतर ते दुप्पट पगारवाढीसाठी पात्र ठरतील, अशी माहिती मिळत आहे.
इन्फोसिस अशा संस्थांपैकी एक आहे, ज्यात कर्मचाऱ्यांवर जास्तीत जास्त खर्च केला जातो. इन्फोसिसच्या वार्षिक अहवाल 2017-2018 च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018 मध्ये इन्फोसिसने कर्मचारी लाभ खर्चाच्या अंतर्गत 32,472 कोटी रुपये खर्च केले होते. जे वर्ष 2015 मध्ये 30, 944 कोटी रुपयांवरुन 4.9 4 टक्क्यांनी वाढवले होते. तसेच 30 सप्टेंबर 2018 रोजी संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसने निव्वळ नफ्यात 10,110 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
इन्फोसिस कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने वाढ होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2018 07:28 PM (IST)
पगारवाढीसंबंधी इन्फोसिस प्रशासन विचाराधीन असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सतत कंपनी सोडून जाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी इन्फोसिसनं हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -