भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या आग्रहावर दोन्ही देशांमध्ये DGMO स्तरावर सोमवारी सकाळी 10.30 मिनिटांनी फोनवरुन चर्चा झाली. ही चर्चा भारत-पाक सिमेवरील तणावाच्या परिस्थितीवर झाली.
यावर भारताचे DGMO लेफ्टनेंट जनरल ए.के.भट्ट यांनी भारत शांततेसाठी वचनबद्ध असल्याचं मिर्झा यांना सांगितलं. तसेच पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सिमेवर अशांतता निर्माण झाल्याचंही, त्यांनी यावेळी सुनावलं.
भट्ट म्हणाले की, ''जर पाकिस्तानच्या लष्करानं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अन् त्यासाठी क्रॉस फायरिंग केलं. तर भारतीय जवान त्याला चोख प्रत्युत्तर देतील.''
यावर पाकिस्तानकडून स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा उठवला गेला. त्यावरुनही भट्ट यांनी पाकिस्तानच्या DGMO ना चांगलच सुनावलं. भारतीय लष्कराची जगात ख्याती आहे. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना हानी पोहचवत नाहीत.
गेल्या महिन्याभरापासून भारत-पाक सिमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. 2 मे रोजी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्सने भारतीय हद्दीत घुसखोरी करुन, हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. विशेष म्हणजे, यावेळी पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सने त्या दोन्ही शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही केली.
या घटनेनंतर भारत-पाक सिमेवरील तणाव वाढला आहे. भारतीय जवान पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
संबंधित बातम्या