कोलकाता : स्वतःचे हातपाय कुलूपांनी बांधून कोलकात्यात हुगळी नदीत झोकून देणं जादूगाराच्या अंगलट आलं आहे. जादूगार मँड्रेक या नावाने प्रसिद्ध असलेले चंचल लाहिरी बेपत्ता झाले आहेत. कुटुंबीय, पोलिस आणि प्रसारमाध्यमांच्या साक्षीने जीवावर उदार होत त्यांनी हा स्टंट त्यांनी केला.

40 वर्षीय चंचल लाहिरी यांचा प्रशासनाकडून हुगळी नदीपात्रात शोध घेतला जात आहे. 30 फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी हा स्टंट केला. ते सहा सेकंदांनी पाण्यावर आलेही. त्याचवेळी चाहत्यांनी जादूगार मँड्रेक यांनी ही जादू कशी केली, हे आपण सांगू शकतो, असा दावा केला होता.

'मी स्वतःला मोकळं करु शकलो, तर ती जादू असेल, अन्यथा ती शोकांतिका ठरेल' अशी प्रतिक्रिया त्यांनी हा स्टंट करण्यापूर्वी दिली होती. याच ठिकाणी 21 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अशाच प्रकारचा स्टंट आपण केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Black Money | भारताच्या काळ्या पैशांविरोधी लढाईला मोठं यश, स्विस बॅंक 50 नावं देणार 



'मी एका बुलेटप्रूफ काचेच्या बॉक्समध्ये होतो. साखळ्यांनी स्वतःला कुलूपबंद करुन जखडून घेतलं होतं. हावडा ब्रिजवरुन मला खाली सोडण्यात आलं. मी 29 सेकंदांच्या आत बाहेर आलो होतो' अशी माहिती जादूगार मँड्रेक यांनी 'एएफपी'ला दिली होती. यावेळी स्वतःला सोडवणं अधिक कठीण असेल, असंही ते म्हणाले होते.

2013 मध्येही लाहिरी यांनी हा स्टंट केला होता, मात्र बघ्यांनी हुल्लडबाजी केली होती. बॉक्सच्या दरवाजातून त्यांना बाहेर पडताना पाहिल्यानंतर बघ्यांनी त्यांना त्रास दिला होता.