IRCTC Cancelled Trains Today List : भारतीय रेल्वे हा देशातील सामान्य लोकांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. सर्वात आरामदायी आणि सुखकर प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे बघितलं जातं. अशा परिस्थितीत रेल्वे देखील प्रवाशांच्या सोयीची पूर्ण काळजी घेते. देशात दररोज हजारो गाड्या धावतात. रेल्वे प्रशासनानं एखादी ट्रेन वळवली किंवा रद्द केली किंवा वेळापत्रक बदलले, तर अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतं. आज (4 जून) रेल्वेने एकूण 211 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


रेल्वे गाड्या वळवण्यामागे, रद्द करणे किंवा ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यामागे अनेक कारणे आहेत. कधी कधी खराब हवामान हे गाड्या रद्द करण्यामागे कारण असते. पाऊस, वादळ आदींमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या जातात. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेमुळे अनेक वेळा गाड्या रद्द केल्या जातात किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातात. यासोबतच अनेकवेळा रेल्वे रुळांच्या दुरावस्थेमुळे ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो.


आज रेल्वेने एकूण 211 गाड्या रद्द केल्या तर 14 गाड्यांचे वेळापत्रक बदलले 


आज 4 जून 2022 रोजी रेल्वेने एकूण 211 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 14 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, 11 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज ट्रेनने प्रवास करणार असाल तर आज रद्द झालेल्या गाड्यांची यादी जरूर पाहा. कारण तुमचा वेळ त्रास यामुळं वाचणार आहे.


जाणून घेऊया रद्द झालेल्या गाड्यांची यादी कशी तपासायची


रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटला भेट द्या. त्यावर तुम्हाला Exceptional Trains पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा. रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांच्या यादीवर क्लिक करा. तिघांची यादी तपासल्यानंतरच घराबाहेर पडा, असे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.