मुंबई: भारतीय रेल्वेचा प्रवास ग्लॅमरस करण्याच्या दृष्टीने एक नवी ट्रेन रुळावर उतरवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस आहे.

स्वित्झर्लंडमध्ये धावणाऱ्या काचेचं छत असलेली रेल्वे आता भारतातल्या दोन पर्यटनस्थळी धावणार आहे. पहिल्या टप्प्यात काश्मीर आणि विशाखापट्टणममध्ये या रेल्वे चालवल्या जाणार आहेत. या डिसेंबर महिन्यापर्यंत पेरम्बूरच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये तयार होतील.

या काचेच्या कोचद्वारे पर्यटकांना रेल्वेच्या बाहेरील दाहीदिशा पाहता येतील. इतकंच नाही, तर या ट्रेनच्या खुर्च्या या 360 अंशात फिरणाऱ्या असतील. ज्यामुळे चहूबाजूचे दृश्य पर्यटकांना पाहता येईल.

भारतातल्या रेल्वे पर्यटनाला चालना देण्यासाठी या नव्या रेल्वे रुळावर उतरवणार असल्याची माहिती, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.