विशाखापट्टणम : भारतीय तथा परदेशी पाहुण्यासाठी रेल्वेचा प्रवास अजून सुखावणारा ठरणार आहे. कारण, भारतीय रेल्वेनं पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नव्आ विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली आहे. रविवारी ही नवी


ट्रेन आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम ते  छत्तीसगडच्या किरंदुलदरम्यान धावली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भुवनेश्वरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नव्या ट्रेनचं लोकार्पण केलं. विस्टाडोम कोचची ट्रेन ही पूर्णपणे वातानुकुलित आहे.

फोटो सौजन्य : भारतीय रेल्वे

विस्टाडोम ट्रेन काय आहे?

या नव्या ट्रेनसाठी रेल्वे मंत्रालयाने 3.38 कोटी रुपये खर्च केले असून, या ट्रेनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे, या ट्रेनच्या दोन्ही बाजूंसोबत छतालाही काचा बसवण्यात आल्या आहेत. यातून रेल्वे प्रवाशांना आसपासचं निसर्ग सौंदर्य पाहता येतं. या ट्रेनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या ट्रेनमधील सीट 360 अंशात फिरवता येते. शिवाय याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत.

या ट्रेननं विशाखापट्टणम ते अराकुघाटी पर्वत स्टेशनपर्यंत 128 किलोमीटर प्रवास करताना निसर्गाचं अद्भुत सौंदर्य प्रवाशांना पाहता येईल. देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी रेल्वेनं ही नवी सेवा सुरु केली असल्याचं यावेळी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.



सर्वप्रकारच्या यात्रेकरुंसाठी विशेष ट्रेन

या नव्या सेवेतून आपलं उत्पन्न वाढवण्याचाही रेल्वेचा मानस आहे. यासाठी रेल्वेने नवनव्या योजना सुरु करणार आहे. त्यानुसार परदेशी पर्यटकांसाठी लक्झरी पर्यटक ट्रोन (LTT) चालवण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये परदेशी पाहुण्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील.  तर देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी सेमि लक्झरी टूरिस्ट ट्रेन (SLTT) ही चालवण्यात येणार आहे. भारत दर्शनासाठी BTD ही ट्रेन सेवाही सुरु करण्यात येणार आहे. यातील सर्व कोच स्लीपर असतील. या ट्रेनचा तिकीट दर सर्वसामान्य मेल एक्सप्रमाणेच असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठीही विशेष सुरु करण्यात येणार असून, आस्था सर्किट ट्रेन (ACT) ही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांसाठीच असणार आहे. तर बुद्ध स्पेशल ट्रेन (BCT)  ही देखील एक विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहे.