इंडियन आयडॉलच्या स्पर्धकाने 80 लाख लुटले
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2016 03:07 PM (IST)

नवी दिल्ली: इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोच्या एका माजी स्पर्धकाला तांदूळ व्यापाऱ्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या लुटीत एकूण चार जणांचा समावेश असून, ही घटना 28 जुलै रोजी घडली. इंडियन आयडॉलच्या पाचव्या पर्वासाठी पुनीत पात्र ठरला होता. दुर्दैवाने त्याला दुसऱ्या फेरीतच बाहेर पडावे लागले. मात्र, तरीही त्याचे गाणे सुरुच होते. दरम्यान त्याचे गाण्याचे ट्रेनिंग सुरुच ठेवण्यासाठी पैशांची अतिशय गरज होती. त्यावेळी त्याने आपल्या तीन साथीदारांसह एका खासगी कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांकडील 80 लाखाला लुटले. या घटनेची पोलीस स्थानकात तात्काळ नोंद करण्यात आली. यातील तिघांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. अटकेच्या भीतीने पुनीत अमृतसरला पळून गेला. पण जेव्हा चोरी केलेले पैसे संपले तेव्हा तो दिल्लीत परतला. याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अटकेनंतर पुनीतनेही आपला गुन्हा कबूल केला.