भारताचा दहशतवादावर वार! 14 जणांच्या यादीतील 6 दहशतवादी ठार, आता उरलेल्यांचा नंबर 

Operation Nader Tral : गेल्या 48 तासांमध्ये भारतीय लष्कराने सहा दहशतवाद्यांना ठार केलं आहे. हे दहशतवादी मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये वरच्या स्थानी होते. 

Continues below advertisement

मुंबई : ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 48 तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलं. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले.

Continues below advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन टेररिस्ट' जोरात सुरु आहे. भारतानं दहशतवादाची पाळंमुळं खणून काढायचं ठरवलंय. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं 100 पेक्षा जास्त दहशतावाद्यांना ठार केलं. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबाससह इतर दहशतवादी संघटनांचे 9 तळं उद्ध्वस्त केले. मग ऑपरेशन केलर राबवून शोपियानमध्ये तीन दहशतवादी ठार केले. त्याच्या दोन दिवसांनी पुलवामाजवळच्या नादरजवळ 
आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. 

Operation Nader Tral : ऑपरेशन नादर, तिघांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या त्रालमधील नादर भागात गुरुवारी सकाळी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी सैन्यानं वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अखेर काही तासांच्या या चकमकीनंतर लपलेल्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं एकेक करुन मारलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. 

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 संशयित दहशतवाद्यांची यादी तयार केली होती. त्रालमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा या यादीत समावेश होता. हे तिघेही दहशतवादी जैश ए मोहम्मदशी संबंधित होते.

ठार झालेले दहशतवादी कोण? 

आसिफ अहमद शेख

- जैश-ए-मोहम्मदमध्ये 18 एप्रिल 2022 पासून सक्रिय. पुलवामाच्या त्रालचा रहिवासी. 

आमीर नझीर वाणी

- जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी, 26 एप्रिल 2024 पासून सक्रिय. पुलवामाच्या त्रालचा रहिवासी. 

यावर अहमद भट्ट

- जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी, 26 ऑगस्ट 2024 पासून सक्रिय. पुलवामाच्या त्रालचा रहिवासी. 

महत्वाचं म्हणजे या चकमकीच्या आधी दहशतवादी आमीर वाणीचा आईसोबत बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात आमीर वाणीची आई त्याला सैन्याला शरण जा असा सल्ला देत आहे. 

दोन दिवसांपूर्वी तीन दहशतवादी ठार

दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाच्या शाहीद कुट्टे, अदनान शफी आणि अमीर अहमद डार या तीन दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं ठार केलं होतं. गेल्या 48 तासात 14 दहशतवाद्यांच्या या यादीतील 6 जणांचा खात्मा झाला आहे. 

ऑपरेशन सिंदूर असो, ऑपरेशन केलर असो किंवा त्रालमधलं ऑपरेशन नादेर... गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांविरोधातल्या या यशस्वी ऑपरेशन्समधून भारतीय सैन्यानं स्पष्ट इशारा दिला आहे... दहशतवादाला आता थारा नाही. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola