Air India Express : विमान प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता फक्त 1300 रुपयांमध्ये विमानाने प्रवास करता येणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून मर्यादीत दिवसांसाठी ही ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये, प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 3 किलो अतिरिक्त केबिन बॅगेज प्री-बुक करु शकतात.
1300 रुपयांमध्ये प्रवासाची ही खास ऑफर एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट www.airindiaexpress.com आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्रवाशांना शून्य सुविधा शुल्क म्हणजेच कोणतेही अतिरिक्त बुकिंग शुल्क द्यावे लागणार नाही. ही विक्री 18 मे 2025 पर्यंत सुरू राहील आणि प्रवास कालावधी 1 जून ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस लाइट ही चेक-इन बॅगेजशिवाय प्रवाशांसाठी एक विशेष भाडे योजना आहे. यामध्ये, प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 3 किलो अतिरिक्त केबिन बॅगेज प्री-बुक करू शकतात. याव्यतिरिक्त, चेक-इन बॅगेजवर देखील सवलतीचे दर लागू आहेत. देशांतर्गत फ्लाइट्समध्ये 1000 मध्ये 15 किलो बॅगेज आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये 1300 मध्ये 20 किलो बॅगेज. या सेलमध्ये एक्सप्रेस व्हॅल्यूचे भाडे 1524 पासून सुरू होते, जे प्रमुख बुकिंग चॅनेलवरून बुक करता येते.
लॉयल्टी सदस्यांना विशेष सवलती
•एक्सप्रेस बिझ भाड्याने आणि अपग्रेडवर 25 टक्के सूट• गौरमायरच्या गरम जेवणावर 25 टक्के सूट, सीट निवड, प्राधान्य सेवा आणि अतिरिक्त सामान भत्ता•हे सर्व फायदे फक्त वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर उपलब्ध आहेत.
एक्सप्रेस बिझ ही एअर इंडिया एक्सप्रेसची प्रीमियम अनुभव आहे. जी प्रवाशांना 58 इंचांपर्यंतची सीट पिच देते. ही सेवा एअरलाइनच्या 40 नवीन बोईंग 737-8 विमानांवर उपलब्ध आहे, दर आठवड्याला एक नवीन विमान जोडले जात आहे. याशिवाय, एअर इंडिया एक्सप्रेस विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि सशस्त्र दलातील सदस्य आणि त्यांच्या अवलंबितांसाठी विशेष भाडे सवलती देखील देते.
महत्वाच्या बातम्या: