Helicopter Crashed in  Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) सियांग जिल्ह्यात (Siang District) भारतीय सैन्याच्या (Indian Army) हेलिकॉप्टरला अपघात (Helicopter Crashed) झाला असून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे. 


महिन्याच्या सुरुवातीलाही झालं होतं हेलिकॉप्टर क्रॅश 


अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीलाही अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात 'चित्ता' हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की, "तवांगजवळील फॉरवर्ड एरियामध्ये उड्डाण करणारं आर्मी एव्हिएशन चिता हेलिकॉप्टर 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नियमित उड्डाण करताना क्रॅश झालं. दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं असून तिथे पायलटचा मृत्यू झाला होता."


 






ध्रुव हेलिकॉप्टरची वैशिष्ट्य


ध्रुव हेलिकॉप्टर हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित भारतातील बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. हे भारतीय सशस्त्र दलांना पुरवलं जातं आणि नागरी आवृत्ती देखील उपलब्ध आहे. हे हेलिकॉप्टर सर्वात आधी नेपाळ आणि इस्रायलमध्ये निर्यात करण्यात आलं आणि नंतर लष्करी आणि व्यावसायिक वापरासाठी इतर अनेक देशांनी हे हेलिकॉप्टर आयात केलं. हे हेलिकॉप्टर लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. तसेच, ध्रुव हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे.