नवी दिल्ली : भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाचा बदला घेताना गोळ्यांची मोजदाद करु नका, असे  आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याला दिले आहेत.

'लष्करावर पूर्ण विश्वास ठेवा, जवान याचं चोख उत्तर लवकरच देतील.' अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी देशवासियांना आश्वासन दिलं आहे.

दुसरीकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यावर तीव्र शब्दात टीका केली. 'आम्ही पाकिस्तानला माफ करणार नाही. त्यांना याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील.' असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'पाकिस्तान आपल्यावर मिसाईलने हल्ले करत जवानांचे प्राण घेत आहे. अशावेळी आपल्या मिसाईल फक्त केवळ राजपथावर प्रदर्शनासाठी आहेत का? की, 26 जानेवारीला परदेशी नेत्यांना दाखवण्यासाठी आहेत?' अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

रविवारी (4 फेब्रुवारी) रात्री जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्ताननं क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यात राजौरी सेक्टरमधील भारताचे 4 जवान शहीद झाले. तर दोन स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले. गेल्या एका महिन्यात पाकनं तब्बल 130 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

संबंधित बातम्या : 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा लष्करी तळावर ग्रेनेडनं हल्ला 

काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलनं हल्ला, कॅप्टनसह ४ जवान शहीद