पुंछ (जम्मू काश्मीर) : भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. एलओसी पार करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून हा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानने सोमवारी (25 डिसेंबर) संध्याकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यानंतर भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. कारवाई करत पाकिस्तानच्या तीन जवानांना कंठस्नान घातलं. यानंतर भारतीय सैन्याच्या एका पथकाने संध्याकाळी 6 वाजता पुंछमधील रावळकोटच्या रुख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या तीन सैनिकांना लक्ष्य केलं.
वीरपुत्र शहीद प्रफुल्ल मोहरकर अनंतात विलीन
हे सैनिक '59 बलूच रेजिमेंट'चे होते. सैन्याच्या या कारवाईत पाकिस्तानचे पाच जवानही जखमी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतरची ही पहिलीच क्रॉस-बॉर्डर रेड होती.
पाकिस्तानचा भ्याड हल्ला, मेजरसह 4 जवान शहीद
यासोबतच शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा भारताने बदला घेतला. 23 डिसेंबर रोजी केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने पेट्रोलिंग पथकावर भ्याड हल्ला केला होता. यात महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर, लान्स नायक गुरमेल सिंह, लान्स नायक कुलदीप सिंह आणि शिपाई परगट सिंह शहीद झाले होते.
लग्नाच्या वाढदिनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
सूत्रांच्या माहितीनुसार, LOC जवळ रावळकोटमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. यानंतर भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि तीन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. तर पाच सैनिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानकडूनही कारवाईला दुजोरा
यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने तीन जवानांचा मृत्यू झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला. हे तीन जवान पाकिस्तानी लष्कराच्या बलूच रेजिमेंटचे होते. मात्र पाच नाही तर एकच सैनिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कारातर्फे करण्यात आला आहे.
पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्यातील मेजरसह चार जवान शहीद