नवी दिल्ली / जम्मू काश्मीर: भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं कसा धडा शिकवला हे दाखवणारा एक व्हिडिओच आता भारतीय लष्करानं जारी केला आहे.

1 मे रोजी कृष्णा घाटीमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उद्धवस्त केल्या होत्या. या हल्ल्यासाठी अँटी टँक गायडेड मिसाईलचा वापर करण्यात आला होता. या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातलं होतं.

पण, अशी कोणतीही कारवाई झाली नाही, असा कांगावा पाकिस्तान करत होतं. पण आज अखेर भारतानं या कारवाईचा व्हिडिओच जारी केल्यानं पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे.

पाकच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त भारताचं सडतोड उत्तर

एबीपी न्यूजला हा व्हिडिओ लष्करातील सुत्रांकडून उपलब्ध झाला आहे. नुकतंच लष्करप्रमुखांनी नुकतंच म्हटलं होतं की, 'त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देऊ.' लष्करातील सुत्रांच्या मते, ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर आणखी तीव्र कारवाई केली जाऊ शकते. 'आता पाकिस्तानवर कारवाई कुठे आणि कधी करायची हे आम्ही ठरवू.' असंही लष्करप्रमुखांनी म्हटलं होतं.

जम्मूत दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पाच रायफल लुटल्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्करानं दहशतवाद्यांच्या साथीनं भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा गस्तीवर असलेल्या जवानांवर त्यांनी अचानक हल्ला केला. यामध्ये दोन जवानांच्या मृतदेहाचीही त्यांनी विटंबना केली. पाकिस्तानी लष्करानं याआधीही अशाप्रकारचं कृत्य केलं आहे. त्यामुळे आता भारतीय लष्करानं देखील त्यांच्या तळावर हल्ले करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

VIDEO:



संबंधित बातम्या:

पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका पोलिसासह तीन नागरिकांचा मृत्यू

काश्मिरी तरुणांचा हिजबुलच्या दहशतवाद्यांकडून छळ, व्हिडीओ व्हायरल

लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान जखमी