मिराजची क्षमता पाहून घाबरलेला पाकिस्तानच्या एफ16 विमानांचा ताफा माघारी परतला. पाकिस्तान मिराजच्या प्रत्युत्तरासाठी पुढे आलाच नाही. या घटनेने भारतीय वायू सेनेची ताकद, मिराज 2000 (वज्र)या लढाऊ विमानांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. जगातल्या चौथ्या मोठ्या हवाई दलासमोर आपला टिकाव लागणार नाही. हे लक्षात आल्यावर पाकिस्तानची विमान घाबरली. याबाबतची माहिती एएनआय या इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.
VIDEO : मिराजच्या हल्ल्यात तब्बल 200 अतिरेकी ठार | श्रीनगर | एबीपी माझा
14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर सफोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.
आज भारताने निंयत्रण रेषा ओलांडली. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. 1 हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.
VIDEO
काय आहे मिराज 2000 फ्रांसिसी लढाऊ विमान
डसॉल्ट मिराज 2000 एक फ्रांसिसी लढाऊ विमान आहे.
या विमानाला वज्र विमान असेही नाव दिले आहे.
हे विमान वायू सेनेचे प्रायमरी विमान आहे.
हे विमान शत्रूंच्या इलाक्यात लेजर गायडेड बॉम्बने हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
सध्या भारतीय सेनेकडे 51 मिराज विमान आहेत.
भारतीय सेनेमध्ये 1985 मध्ये ही विमानं सहभागी झाली.
14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.