WhatsApp India Head Resigns : व्हॉट्सअॅप इंडिया या मेसेजिंग अॅपचे प्रमुख अभिजित बोस यांची त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोस यांच्यासोबतच मेटा इंडियाचे इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांनीही देखील राजीनामा दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवनाथ ठुकराल यांची व्हॉट्सअॅप इंडियासह मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते व्हॉट्सअॅप इंडियाच्या सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख होते. नुकतेच व्हॉट्सअॅप आणि फेसबुकची पेमेंट कंपनी मेटाने अलीकडेच आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे भारत प्रमुख अजित मोहन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला होता.
व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी एका निवेदनातून अभिजित बोस यांच्या राजीनाम्याबाबतची माहिती दिली आहे. "मी व्हॉट्सअॅपच्या वतीने अभिजित बोस यांचे आभार मानू इच्छितो. व्हॉट्सअॅप इंडियाचे पहिले प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. त्यांनी आमच्या सेवा लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील करोडो लोकांना आणि व्यवसायांना याचा फायदा झाला आहे. व्हॉट्सअॅप इंडिया भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी यापुढेही काम करत राहील. यासोबतच व्हॉट्सअॅप इंडियाच्या प्रमुखाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजीव अग्रवाल यांचाही राजीनामा
अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु कंपनीने मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांच्याबद्दल सांगितले की, ते एका चांगल्या संधीच्या शोधात असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
यापूर्वी, फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे भारत प्रमुख अजित मोहन यांनीही 3 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये सामील होणार आहेत. मोहन हे आशिया-पॅसिफिकचे प्रमुख म्हणून काम पाहतील.
महत्वाच्या बातम्या