Weather Update Today : राज्यासह देशात हिवाळ्यात (Winter) पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरातील हवामानात मोठा बदल झाला आहे. आजही देशभरात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) आज महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरात विविध ठिकाणी हवामान विभागाकून अलर्ट जारी करण्यात आला आहे.


विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता


अंदमान-निकोबार बेटांसह बर्‍याच ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या अंदमान निकोबार बेटांवर आज 25 ते 35 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग 45 ते 45 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून राज्याच्या दक्षिण भागात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल परिसरात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाचा अंदाज


भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rainfall Prediction) पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. तर, तामिळनाडू (Tamil Nadu), पुद्दुचेरी (Puducherry), कराईकल (Karaikal), केरळ (Kerala) आणि माहे (Mahe) येथे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


दरम्यान, बुधवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सकाळच्या वेळी दाट धुक्यासारखी स्थिती राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान समुद्रालगत कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी सकाळी 8:30 वाजता पश्चिमेकडे सरकले आणि दक्षिण अंदमान समुद्रावर पसरलं आहे. कमी दाबाचे क्षेत्र  पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबरच्या सुमारास आग्नेय बंगालच्या उपसागरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे दबाव वायव्येकडे सरकून दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात 48 तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची अपेक्षा आहे. यामुळे देशभरात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Weather : राज्यात पुढील 48 तास पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट, शेतकऱ्यांची चिंता वाढली