नवी दिल्ली : भात आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढलेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत 9 दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारताकडून पाकिस्तानच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तरं दिलं जात आहे.  पाकिस्तानकडून नागरी विमान वाहतुकीच्या नावाखाली भारतावर हल्ल्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतानं पाकिस्तानचा बनाव जगासमोर उघडा पाडला आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांचं लक्ष दोन्ही देशांवर आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमधील गावांमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. 

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाकिस्तानचे हल्ले परतवले जात आहेत. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल पाडल्या आहेत. देशप्रेमाच्या भावनेतून काही ठिकाणी लोक आर्मीत जाऊन काम करण्यात उत्साही असल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होतं आहे. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं युद्धात सहभागी होऊन देशभक्ती दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, पोलीस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का यासंदर्भातील नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

पोलीस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का?

पोलिसांकडे अंतर्गत सुरक्षा कायम राखण्याची जबाबदारी असते. पोलीस सीमा सुरक्षा किंवा आंतरराष्ट्रीय युद्धात सहभागी होत नाहीत. पोलीस दलातील वरिष्ठ रँकचे अधाकीर, काही विशेष परिस्थितीत युद्धासारख्या स्थितीत त्यांचं योगदान देऊ शकतात. BSF,CRPF, ITBP,CISF आणि SSB यासारख्या निमलष्करी दलांतील किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील अधिकारी आयपीएस केडरमधील अशतात. सीमा सुरक्षा, दहशतवाद विरोधी अभियान किंवा तणावग्रस्त भागांमध्ये महत्त्वाचं योगदान देतात. 

जेव्हा एखाद्या देशात आपत्कालीन स्थिती निर्माण होते त्यावेळी सरकार पोलिसांना सेनादलात पाठवू शकतं. मात्र, देशात आप्तकालीन स्थिती निर्माण जाली नाही तर पोलिसांना युद्धात पाठवलं जात नाही. पोलीस दलातील अधिकारी सैन्यात भरती होऊन तिकडून युद्धात सहभागी होऊ शकतात. 

India Vs Pakistan War Opration Sindhoor मोठी बातमी : भारताच्या हल्ल्याची दाहकता हळूहळू दिसली, मसूद अझरच्या दोन्ही मेहुण्यांसह 5 बड्या दहशवाद्यांचा खात्मा, सर्वांची नावं समोर!