Agni-Prime Missile : भारताने आज एक ऐतिहासिक कामगिरी करत अंतरमध्य पल्ल्याच्या ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे हे क्षेपणास्त्र प्रथमच रेल्वेवर आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टमवरून (Rail-based Mobile Launcher) प्रक्षेपित करण्यात आले. या प्रक्षेपणानंतर भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या यादीत सामील झाला आहे.

Continues below advertisement


2000 किमी पल्ल्याची क्षमता


'अग्नी-प्राईम' हे नवीन पिढीचे (Next-Generation) क्षेपणास्त्र असून त्याची कमाल मारक क्षमता 2000 किमी आहे. या क्षेपणास्त्रात कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टीम, अचूक मार्गदर्शन प्रणाली आणि वेगवान प्रतिसाद क्षमतांसह (Quick Reaction Capability) इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे क्षेपणास्त्र स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या वापरासाठी विकसित करण्यात आले असून DRDO ने त्याची रचना व विकास केला आहे.


रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर: भारताची नवी ताकद


या चाचणीत वापरलेली स्पेशली डिझाईन केलेली रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर सिस्टीम भारतासाठी एक नवे सामरिक बळ आहे. ही प्रणाली कोणत्याही पूर्वतयारीशिवाय देशभरातील रेल्वे नेटवर्कवरून सहजतेने हलवता येते. त्यामुळे युद्धपरिस्थितीतही कमीत कमी वेळेत आणि लपवून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते, जे शत्रूसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.






राजनाथ सिंह यांनी दिली माहिती


या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून DRDO, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "भारताने रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर प्रणालीवरून अंतरमध्य पल्ल्याच्या 'अग्नी-प्राईम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे नवीन पिढीचे क्षेपणास्त्र असून 2000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यापर्यंत मारक क्षमता असलेले आहे आणि यात विविध अत्याधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.


आज रेल्वेवर चालणाऱ्या खास डिझाइन केलेल्या मोबाईल लाँचरवरून झालेली ही प्रकारातील पहिली चाचणी असून, ही प्रणाली रेल्वे नेटवर्कवर कोणत्याही पूर्वअटीशिवाय हालचाल करू शकते, ज्यामुळे वापरकर्त्याला देशभरात हलवण्याची लवचिकता मिळते आणि अत्यल्प वेळेत कमी दृश्यता राखून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते.'अग्नी-प्राईम' क्षेपणास्त्राच्या या यशस्वी चाचणीबद्दल DRDO, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन. या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे चालत्या रेल्वेवरून 'कॅनिस्टराइज्ड' लाँच सिस्टीम विकसित करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे," असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा


Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश, दहशतवाद्यांना मदत करणारा मोहम्मद कटारिया अटकेत, श्रीनगर पोलिसांची कारवाई