Coal Import: कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने देशातील वीज प्रकल्पांना पुरेसा इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 24.16 लाख टन कोळसा आयात करण्यासाठी पहिली निविदा काढली आहे. जीवाश्म इंधनाच्या कमतरतेमुळे एप्रिलमध्ये पुन्हा वीज कपात टाळण्यासाठी सरकार कोळशाचे साठे तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  


24.16 लाख टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या


"कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने बुधवारी पहिल्यांदाच 24.16 लाख टन कोळशाच्या आयातीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोलीसाठी ई-निविदा काढली आहे. ज्यामध्ये 24.16 लाख टन कोळशाच्या आयातीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहे,'' असे कंपनीने म्हटले आहे. वीज निर्मिती कंपन्या (जेनकोस) आणि स्वतंत्र ऊर्जा प्रकल्प (IPPs) यांच्याकडून मिळालेल्या मागणीच्या आधारे कोळसा मागवला जाणार आहे. या ई-निविदेत सांगण्यात आले आहे की, ही मागणी चालू आर्थिक वर्ष 2022-22 च्या जुलै-सप्टेंबर कालावधीसाठी आहे.


सीआयएलसाठी कोळशाची आयात हे नवीन काम आहे. कंपनीने सात राज्य वीज निर्मिती कंपन्या आणि 19 आयपीपीकडून इंडेंट प्राप्त केल्यानंतर एका आठवड्याच्या आत युद्धपातळीवर निविदा जारी केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी कोरड्या इंधनाच्या आयातीसाठी सध्याच्या अल्प-मुदतीच्या निविदा अंतर्गत कोणत्याही देशातून कोळसा खरेदी केला जाऊ शकतो.


निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख 29 जून आहे. सीआयएलने सांगितले की, निविदेतील कोणत्याही तपशीलावर स्पष्टीकरण मिळविण्यासाठी 14 जून रोजी निविदापूर्व बैठकीचा पर्याय आहे. बोली प्रक्रियेद्वारे निवडलेली एजन्सी Genco आणि IPP च्या वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करेल. सरकारने याआधी सीआयएलला पॉवर युटिलिटीसाठी पुढील 13 महिन्यांसाठी 1.2 कोटी टन कोळसा आयात करण्यास तयार राहण्याचे निर्देश दिले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


'प्लास्टिक स्ट्रॉ' वापरावर 1 जुलैपासून बंदी, 10 कोटी शेतकऱ्यांचे होणार नुकसान?
Birsa Munda : आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याविषयी थोडक्यात...