नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि LPG च्या टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलं आहे. पेट्रोलियम मंत्रायलाने (Ministry of Petroleum and Natural Gas) स्पष्टपणे सांगितले की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच देशातील सर्व पेट्रोल पंप आणि LPG वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहितीही सरकारने दिली.
Fuel Supply Status India : इंधन साठा सुरक्षित
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही.
LPG Misinformation Alert : अफवांपासून सावध राहा, सरकारचं आवाहन
सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे की, काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
Government Appeal : नागरिकांना सरकारचे आवाहन
मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितलx की नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये. पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरवठा सुरळीत सुरू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई किंवा घबराट करण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी भारताने परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Kerosene Allocation : केंद्राकडून राज्यांना केरोसिन वाटप
आखाती देशातील युद्धाचा फटका देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असल्याचं चित्र आहे. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली आली आहे. त्यातच, आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारकडून राज्यांसाठी 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून राज्यातील शिधापत्रिका धारकांना 3 लिटर रॉकेल मिळणार आहे. त्यामुळे गॅस आल्यानंतर कुठेतरी कोपऱ्यात पडलेला स्टोव्ह आता पुन्हा बाहेर काढावा लागणार असल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा:
