Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेवरुन प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) चांगल्याचं भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदारांच्या बैठकीची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मला भाजप, राष्ट्रवादीचे लोक सांगतात. तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यसभेच्या जागेसाठी (Rajyasabha Election 2026) मल्लीकार्जून खरगे, के. सी वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी काँग्रेसच्या म्हणण्यानूसार विरोधी पक्षाच्यापदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असं सांगत आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला यांची माहिती उद्धव ठाकरे देत असताना अचानक प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला.
उद्धव ठाकरे बैठकीत बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी भडकल्या, काय म्हणाल्या? (Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi)
उद्धव ठाकरे बैठकीत बोलत असताना राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी भडकल्या. प्रियंका चतुर्वेदी यांनी I want to protest. Why Sanjay Raut was giving a statement about Sharad Pawar?, संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं?, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. यावर ते (संजय राऊत) बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. ते बोलले म्हणून काय झालं शेवटी निर्णय मीच घेईल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली, अशी सूत्रांनी माहिती दिली.
संजय राऊत काय म्हणाले? (Sanjay Raut On Priyanka Chaturvedi)
बैठकीत खडाखडी झाल्याचं वृत्त ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊतांनी फेटाळलं. मी त्या बैठकीत नव्हतं, पण तिथे असं काही घडलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून बिनविरोध झालेल्या खासदारांची यादी- (Maharashtra Candidate List For Rajya Sabha Election 2026)
- शरद पवार (Sharad Pawar)
- रामदास आठवले (Ramdas Athawale)
- विनोद तावडे (Vinod Tawde)
- माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate)
- रामराव वडकुते (Ramrao Wadkute)
- ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)
- पार्थ पवार (Parth Pawar)
