Omicron Variant Guidelines: प्रचंड वेगानं पसरणाऱ्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतानं नवी नियमावली जाहीर केलीय. या नियमावली नुसार, परदेशातून भारत येणाऱ्या नागरिकांना मागील 14 दिवसांच्या ट्रव्हेल हिस्ट्रीची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय, प्रवाशांना प्रवास करण्याआधीच एअर सुविधा पोर्टलवर त्यांचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अपलोड करणे बंधनकारक असणार आहे.


केंद्र सरकारनं 12 देशांची यादी जाहीर केलीय. ज्यांना अधिक धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आलंय. या यादीत यूकेसह युरोपियन युनियनचे सर्व देश दक्षिण अफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, बोत्सावाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे. या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर, त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा त्या व्यक्तीला कोरोना चाचणी करावी लागेल. मात्र, त्यावेळीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर, त्याला पुढील सात दिवस स्वत: ला मॉनिटरिंग करावं लागेल. तर, अधिक धोकादायक श्रेणीत न भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी असेल. त्यांना पुढील 14 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावं लागणार आहे. कोणत्याही विमानातून भारतात येणाऱ्या प्रवाशांपैकी पाच टक्के प्रवाशांची रॅन्डम कोरोना चाचणी करण्यात येईल. 


दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन जगभरात खळबळ उडाली. दक्षिण आफ्रिके वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले. यातच दक्षिण अफ्रिकेतून महाराष्ट्राच्या डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. यातच ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-