Corona Vaccination : देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या डोसची संख्या 17.70 कोटींहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत 17.70 लाख लसीचे डोस देण्यात आले. जागतिक स्तरावर सध्या भारत सर्वात जलद वॅक्सिनेशन करणारा देश आहे. भारतात 17 कोटी लसीचे डोस 114 दिवसांमध्ये देण्यात आले आहे. तसेच हा आकडा गाठण्यासाठी चीनला 119 दिवसांचा कालावधी लागला होता आणि अमेरिकेनं हे लक्ष्य 115 दिवसांमध्ये गाठलं होतं. 


केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 वयाच्या 4,17,321 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील लसीचे डोस घेतलेल्या एकूण लोकांची संख्या 34,66,895 झाली आहे. 


आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, "देशात देण्यात आलेल्या कोविड लसीच्या डोसची एकूण संख्या 17 कोटी 70 लाख 85 हजार 371 झाली आहे." याव्यतिरिक्त 45 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना 5,62,14,942 आणि 81,31,218 नागरिकांना अनुक्रमे पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 60 वर्षांवरील 5,40,88,334 आणि 1,67,64,979 नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. 


लसीकरण मोहिमेच्या 117 व्या दिवशी (12 मे) लसीचे एकूण 17 लाख 72 हजार 261 लसीचे डोस देण्यात आले आहेत. एकूण 9,38,933 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि 8,33,328 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. एकूण लसीच्या डोसमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, यूपी, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरल, बिहार, आंध्र प्रदेश जवळपास 66 टक्के देण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :