Omicron Sub-variant  BF.7: चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या बीएफ 7 या ओमायक्रोनच्या सब व्हेरियंटचे (Omicron Sub-variant  BF.7) भारतामध्ये चार रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचा हा सबव्हेरियंट 18 पटीने पसरतो. या विषाणूचे गुजरात आणि ओडिसामध्ये या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.  चीनमध्ये BF.7 या ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटने धुमाकूळ घातलाय. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भारत सरकारने पावले उचलली आहेत. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
BF.7 सब व्हेरियंटबद्दल...


BF.7 हा ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे.  (Omicron Sub-variant  BF.7)  म्यूटेशननंतर हा विषाणू तयार झाला आहे.  हा व्हेरियंट BA.5.2.1.7 यासारखा आहे. जानेवारी 2022 मध्ये भारतामध्ये  ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या सब-वेरियंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यानंतर BA.4 आणि BA.5 हे व्हेरियंट आढळले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये   BF.7 हा विषाणू भारतात आढळला होता, पण त्यावेळी याचे रुग्ण खूप कमी आढळले होते. 
 
10-18 पट वेगानं पसरतो हा विषाणू 


तज्ज्ञांच्या मते BF.7 हा ( reproduction number) विषाणू 10 ते 18.6 पट वेगानं पसरतो. म्हणजेच या रोगानं बाधित झालेला रुग्ण 10 ते 18 लोकांना बाधित करतो.  ओमायक्रॉनबाधित रुग्ण सरासरी   5.08  लोकांना बाधित करतो.. पण BF.7 या सब व्हेरियंटने बाधित झालेला रुग्ण तीनपट अधीक लोकांना बाधित करतो. त्यामुळे चिंतेत वाढ झली आहे. 


BF.7 ची लक्षणं काय? Symptoms of BF.7


रिपोर्ट्सनुसार BF.7 हा व्हेरियंट (Omicron subvariant symptoms) श्वसनाला अडचण करतो. म्हणजेच  आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमला प्रभावित करतो. ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी यासारखी लक्षणे BF.7 व्हेरियंटच्या रुग्णाची आहेत. त्याशिवाय कोरोनाच्या इतर व्हेरियंटप्रमाणे लक्षणं असू शकतात.   


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना-


आता कुठे कोरोना नावाचं संकट मागे सारुन सगळं सुरळीत सुरु झालं होतं, आता कुठे मास्कविना चेहरे दिसू लागले होते.. मात्र आता पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्कनं घातलेले चेहरे दिसणार आहेत. कारण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयानं केलंय. तसंच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यावं अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत.. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नीती आयोगाचे सदस्यही उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.