India Coronavirus Updates : भारतात सध्या दररोज जवळपास 45 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालायानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 45,352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यापूर्वी एक दिवसाआधी देशात 47,092 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 366 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 34,791 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून आतापर्यंत चार लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये भारत आता सातव्या स्थानी पोहोचला आहे. 


भारतीत कोरोनाची एकूण आकडेवारी 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 29 लाख 3 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख  39 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 20 लाख 63 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाख आहे. एकूण 3 लाख 99 हजार 778 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत. 


देशातील कोरोनाची सद्यस्थिती :


कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 29 लाख 03 हजार 289
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 20 लाख 63 हजार 616
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 99 हजार 778
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 895
एकूण लसीकरण : 67 कोटी 9 लाख 59 हजार लसीचे डोस


राज्यात काल (गुरुवारी)  4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 04 टक्क्यांवर


राज्यात काल (गुरुवारी)  4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 755  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 81 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे. 


राज्यात काल (गुरुवारी) 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 50 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (59), नंदूरबार (2),  धुळे (23), जालना (19), परभणी (49), हिंगोली (60),  नांदेड (28), अकोला (23), वाशिम (5),  बुलढाणा (60), यवतमाळ (13), नागपूर (82),  वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (2),  गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 43,27,469 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,73,674 (11.92 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,385 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,971  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3418 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील सरकारी, सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर लसीचा उद्या केवळ 'दुसरा डोस'