Covid-19 Update : देशात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार पार
India Coronavirus Update : देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर, 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Update : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेत सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 11 हजारांच्या पुढे
ट्रेंडिंग
देशातील कोरोनाचा संसंर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 11 हजार 711 सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 13 हजार 929 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 65 हजार 519 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात 2971 नवे कोरोना रुग्ण
राज्यातील कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवासंपासून घट होत आहे. महाराष्ट्रात 2971 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 3515 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 78,10,953 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97. 85 टक्के झाले आहे. सध्या 23447 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या