India Coronavirus Updates : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाच दिवसांनी 30 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 26,115 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 252 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 34,469 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या सात दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
14 सप्टेंबर : 27,176 रुग्ण
15 सप्टेंबर : 30,570 रुग्ण
16 सप्टेंबर : 34,403 रुग्ण
17 सप्टेंबर : 35,662 रुग्ण
18 सप्टेंबर : 30,773 रुग्ण
19 सप्टेंबर : 30,256 रुग्ण
20 सप्टेंबर : 26,115 रुग्ण
देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 4 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 45 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 49 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 9 हजार 575 रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.
देशातील सध्याची कोरोना स्थिती :
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 35 लाख 4 हजार 534
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 27 लाख 49 हजार 574
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 18 हजार 181
एकूण मृत्यू : चार लाख 45 हजार 385
देशातील एकूण लसीकरण : 81 कोटी 85 लाख 13 हजार डोस
काल (सोमवारी) राज्यात 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. काल राज्यामध्ये 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 40 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे. राज्यात सध्या 41672 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
काल (सोमवारी) राज्यात 2583 नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात काल 28 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 57164401 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 6524498 (11.41टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 275736 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1677 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Corona : मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर; पुढचे 15 दिवस महत्वाचे