Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. देशात आता दरदिवशी जवळपास 40 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,070 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात 24 तासांत 43,910 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


ऑगस्टमध्ये तिसऱ्यांदा 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 1 ऑगस्ट रोजी 40,134, 2 ऑगस्ट 30,549, 3 ऑगस्त रोजी 42625, 4 ऑगस्ट रोजी 42982, 5 ऑगस्त रोजी 44643, 6 ऑगस्त रोजी 38628 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. 


देशातील कोरोना स्थिती : 


महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 19 लाख 34 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 4 लाख 27 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 10 लाख 99 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अद्याप चार लाखांहून अधिक आहेत. एकूण 4 लाख 6 हजार रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 


कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 19 लाख 34 हजार 455
कोरोनामुक्त : तीन कोटी 10 लाख 99 हजार 771
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : चार लाख 6 हजार 822
एकूण मृत्यू : चार लाख 27 हजार 862
एकूण लसीकरण : 50 कोटी 68 लाख 10 हजार लसीचे डोस देण्यात आले


जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी, केंद्राची माहिती


जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे.  मांडवीय यांनी   ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे.  जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.