India China Faceoff: अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ (Tawang) नुकतीच ही झटापट झाली. भारतीय जवानांनी चीनला (China) चोख प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून (Indian Army) अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.


या झटापटीत भारताचे 30 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. यात अनेक चिनी सैनिकही जखमी झाले आहेत. ज्यांची संख्या जास्त आहे. भारताचा एकही सैनिक गंभीर नसला तरी या झटापटीतनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या कमांडर्सनी चीनच्या कमांडरसोबत फ्लॅग मीटिंग केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 


एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, तवांगमध्ये चिनी सैनिक समोरासमोर आल्यावर भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. जखमी चिनी सैनिकांची संख्या भारतीय सैनिकांपेक्षा जास्त आहे. सुमारे 300 सैनिकांसह चिनी पूर्ण तयारीनिशी आले होते, पण यासाठी भारतीय सैनिकही तयार होते. भारतीय सैनिक तयार असतील, अशी चीनला अपेक्षा नव्हती.










 


गलवान नंतरची पहिली मोठी घटना


दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद (India China Face-Off) झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या झटापटीत चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते.


दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये सीमेच्या बाजूच्या काही भागात दोन्ही बाजूचे सैनिक आपल्या भागात गस्त घालतात. 2006 पासून हे सुरू आहे. या भागात गस्त घालताना अनेकदा भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने (India China Face-Off) येतात. यातच अरुणाचल प्रदेशच्या या भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये आमनेसामने होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये अशीच एक घटना घडली होती. जेव्हा काही चीनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी यांगसे येथे काही तासांसाठी ताब्यात घेतले होते.