त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील केवडियाला जाऊन 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला अभिवादन केलं. सोबतच पंतप्रधान एकता दिवस परेडमध्ये भागही घेणार आहे. तसंच टेक्नॉलॉजी डेमो साईटचा दौरा करतील आणि केवडियामध्ये सिव्हिल सर्व्हिस प्रोबेशनर्ससोबत बातचीत करणार आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय एकता दिवस, रन फॉर युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नरेंद्र मोदीऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांनी 'मन की बात'च्या माध्यमातून लोकांना 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं
तर इकडे मुंबईतील नरिमन पॉईंट इथेही एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रन फॉर युनिटीला फ्लॅग ऑफ करण्यात आला.