नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीवर सहमती दर्शवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओ यांना दुपारी 3.30 वाजता फोन करण्यात आला. यानंतर दोन्ही देशांकडून  गोळीबार, जमीनीवरुन हल्ले, हवाई आणि सागरी कारवाया आज सायंकाळी 5.00  वाजल्यापासून थांबवण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.  यानंतर भारताच्या तिन्ही संरक्षण दलांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये नौदलातर्फे रघू आर नायर, हवाई दलातर्फे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि इंडियन आर्मीकडून कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्ताकडून राबवण्यात येत असलेल्या मिसइन्फॉरमेशन कॅम्पेनचा बुरखा फाडण्यात आला. यावेळी सोफिया कुरेशी यांनी भारत निधर्मी देश आहे, भारतानं मशिदीवर हल्ला केला नाही, असं त्यांनी सांगितलं. 

कर्नल सोफिया कुरेशींनी ठणकावून सांगितलं की भारताकडून एकाही मशिदीवर हल्ला करण्यात आलेला नाही. सोफिया कुरेशी यांनी पाकच्या फेक न्यूजचा पुन्हा बुरखा फाडला. सोफिया कुरेशी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलं की, पाकिस्तानकडून मिस इन्फोर्रमेशन कॅम्पेन राबवलं जात होतं. 

पाकिस्ताननं जेफ -17 नं एस-400 आणि ब्रम्होस मिसाईल बेसला नुकसान पोहोचवलं हे साफ चुकीचं आणि खोटं आहे. पाकनं आणखी एक दावा केला की सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भूज येथील एअरबेसा नुकसान पोहोचवलं, हा दावा पण चुकीचा होता.चंदीगड आणि बियासमधील अम्युनेशन डंक याचं डॅमेज केल्याचा चुकीचा दावा देखील पाकिस्ताननं केला. 

पाकिस्तान पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं भारतीय सैन्यानं मशिदींना नुकसान पोहोचवलं हे देखील चुकीचं आहे. भारत हा निधर्मी देश आहे.आमचं सैन्यदल भारताच्या संविधानिक मूल्यांचं प्रिय दर्शक आहे. 

भारताच्या सैन्यदलानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं आहे. लष्करी सुविधा, जमिनीवरील साधनं, हवाई साधनं असतील त्याचं नुकसान केलं. भारताच्या सैन्यदलानं पाकिस्तानच्या एअरबेस जखूबाबाद, बुलारी यासह इतर एअरबेसचं नुकसान केलं. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम, रडार सिस्टीमचं नुकसान केलं. पाकिस्तानच्या ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह क्षमतेला नष्ट करण्यात आलं आहे, असं सोफिया कुरेशी म्हणाल्या.

सोफिया कुरेशींनी पाकला ठणकावलं

शेवटी मला सांगायचंय, भारतीय सैन्य दल पूर्णपणे तयार आहेत, सतर्क आहेत, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या रक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असं सोफिया कुरेशी म्हणाल्या. कमांडर रघू आर नायर यांनी म्हटलं की लष्करी कारवाया, समुद्रावरुन, जमिनीवरुन आणि हवाई माध्यमातून होणाऱ्या थांबवण्यात आल्या आहेत. इंडियन आर्मी,  इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फोर्सला याचे पालन करण्याचे आदेश दिले गेले आहेत.  

विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी आम्ही राबवलेले ऑपरेशन हे दहशतवाद्यांच्या कॅम्प आणि त्यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या फॅसिलिटीजवर होता. ज्याचा वापर भारताच्या विरोधासाठी करण्यात येत होता. भारताच्या सैन्यदलांकडून कोणत्याही धार्मिक स्थळावर हल्ला केलेला नाही, असंही व्योमिका सिंग यांनी सांगितलं.  

भारताच्या सैन्य दलांची पत्रकार परिषद