नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं समजलं जाईल असा इशारा भारतानं दिला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून उत्तर दिलं जाईल. ही भारताकडून करण्यात आलेली सर्वात मोठी घोषणा आहे. यापूर्वी भारत दहशतवादी आणि पाकच्या लष्कराच्या हल्ला यामध्ये थोडासा फरक मानत होता. आता मात्र भारतानं दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सर्वात मोठा निर्णय  घेतला आहे. पाकिस्तानच्या लष्कर पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास ते युद्ध मानून उत्तर देण्याचा निर्णय भारत सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

दहशतावाद्यांचे तळ उद्धवस्त केले मात्र लष्करावर हल्ला केलेला नव्हता. मात्र, यापुढं दहशतवादी हल्ला झाल्यास भारताकडून लष्कर-ए- तोयबा असेल किंवा  पाकिस्तानच्या लष्काराला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. भारतानं दहशतवादी हल्ल्याला युद्धजन्य कृती समजून उत्तर देऊ असं म्हटलं आहे. 

निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी भारत सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. दहशतवादी कृत्य हे देशाविरुद्ध कृती मानलं जातं. देशाविरुद्ध कृती म्हणजे युद्धजन्य कृती असते. भारतानं हा निर्णय घेतला आहे हा  यापूर्वी व्हायला होता. आता निर्णय घेतला असेल तर ठीक आहे. आता शत्रू राष्ट्राकडून किंवा दहशतवाद्यांकडून काही कृती झाल्यास युद्ध सुरु झाल्याचं समजून उत्तर जाईल. 

भारताच्या भूमीवर दहशतवादी कृत्य होईल तेव्हा ती देशाविरुद्ध कृती समजून उत्तर दिलं जाईल, असं अनिल बाम म्हणाले.  भारतानं हे धोरण स्वीकारल्यानंतर इतर देश काय बोलतात याकडे लक्ष देऊ नये. दहशतवादाचा सामना भारताला करावा लागत आहे. भारत कोणत्याही राष्ट्राच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे, असं अनिल बाम म्हणाले. 

भारत सरकारच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध कारवाई मानला जाईल आणि त्यानुसार उत्तर दिलं जाईल. भारत यापुढं दहशतवादी हल्ला युद्धाची कृती समजून उत्तर देईल.  

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची आणि संरक्षण दलाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. भारताकडून वारंवार पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणला जात आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्याकडून ड्रोन, मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, भारताच्या संरक्षण दलांकडून पाकचे हल्ले नाकाम केले जात आहेत. 

इतर बातम्या : 

India Pakistan War: मोठी बातमी : भारताने गिअर बदलला, आता मिशन DEAD सुरु, पाकिस्तान म्हणतं, आता आम्हाला शांती हवी!