Independence Day LIVE UPDATES | पुणे - शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द करुन मुंबईला रवाना

आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिवस. यंदा कोरोनामुळं सगळीकडं हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टंस राखत साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या महत्वाच्या घडामोडी आणि ताजे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Aug 2020 03:47 PM
पुणे - शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द, शरद पवार यांचा बारामती दौरा अचानक रद्द झाल्यानं चर्चांना उधाण, शरद पवार बारामती ऐवजी मुंबईला रवाना
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ध्वजारोहण केले. संजीव मित्तल यांनी संमेलनाला संबोधित करताना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, लॉकडाऊन व अनलॉक दरम्यान मध्य रेल्वेची कामगिरी व कृती याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी, कर्तव्यनिष्ठा यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांचे कौतुक केले आणि सांगितले की, मध्य रेल्वे भविष्यातही रेल्वे वापरकर्त्यांची अपेक्षा पूर्ण करेल. मित्तल यांनी सोलापूर येथे वैद्यकीय सहाय्यक रो (बॉट) आणि मुंबई विभागातील रक्षक रोबोट तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेचे कौतुक केले आणि त्यावर भर दिला. मित्तल यांनी एका दिवसात सर्वाधिक श्रमिक विशेष गाड्या चालविल्या बद्दल, अध्यक्ष रेल्वे बोर्ड यांनी जाहीर केलेल्या वैयक्तिक आणि गट पुरस्कारांचे वितरण केले. मध्य रेल्वेच्या ऑपरेटिंग, कमर्शियल, आरपीएफ, मेडिकल आणि इलेक्ट्रिकल विभागांना हा पुरस्कार देण्यात आला. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा रैली मित्तल आणि सदस्यांनी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल," भायखळा करिता एलईडी टीव्ही आणि वॉटर प्युरिफायरची कागदपत्रे वैद्यकीय संचालक डॉ. मीरा अरोरा यांना औपचारिकपणे सुपूर्द केली. यावेळी, मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीतर्फे आत्मा निर्भर भारत विषयावरील “कलरव” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन सोशल डिस्टंसिंग निकषांनुसार केले गेले होते.

मंत्रालयात राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. श्रीमती रश्मी ठाकरे, इतर मान्यवर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित
प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत आणि दुर्गम भागात चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर, शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास प्राधान्य आणि कामगारांचे हित ही जोपासणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी धवजरोहन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कोरोनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत यंदा ध्वजारोहण सोहळा पार पडला.
भारताच्या सार्वभौमतेचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या संकल्पासाठी आमचे वीर जवान काय करु शकतात, देश काय करु शकतो, हे जगाने लडाखमध्ये पाहिलं. LOC पासून LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमतेवर कोणीही डोळे वटारले तर देशाच्या सैन्याने जशास तसं उत्तर दिलं आहे.
भारताच्या सार्वभौमतेचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या संकल्पासाठी आमचे वीर जवान काय करु शकतात, देश काय करु शकतो, हे जगाने लडाखमध्ये पाहिली. LOC पासून LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमतेवरुन कोणीही डोळे वटारले तर देशाच्या सैन्याने त्याचा त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
'आत्मनिर्भर भारत'च्या निर्माणात, आधुनिक भारताच्या निर्माणात देशाच्या शिक्षणाचा मोठा वाटा आहे. याच विचारासह देशाला तीन दशकानंतर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मिळालं : पंतप्रधान
आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु, प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार - पंतप्रधान मोदी
मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरुन मी जल जीवन मिशनची घोषणा केली होती, ज्या अंतर्गत प्रत्येक घरात नळाचं पाणी पोहचवण्याचं स्वप्न पाहिलं. आज प्रतिदिन 1 लाख घरांत हे कनेक्शन पोहोचवलं जातंय, मागच्या एका वर्षात 2 कोटी लोकांच्या घरात हे कनेक्शन पोहोचलं : पंतप्रधान
समाजातील अविकसित घटकाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे. देशातील ११० अविकसित जिल्ह्यांना प्रगतीपथावर आणायचं आहे : पंतप्रधान
भारताला आधुनिकतेच्या दिशेने वेगाने घेऊन जाण्यासाठी देशाच्या संपूर्ण पायाभूत विकासाला नवी दिशा देण्याची गरज आहे. National Infrastructure Pipeline Project हे गरज पूर्ण होईल. यावर देश 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याच्या दिशेने कूच करत आहे. विविध क्षेत्रातील जवळपास सात हजार प्रकल्प निवडले आहे. पायाभूत क्षेत्रातील ही एकप्रकारची क्रांती असेल : पंतप्रधान
मागच्या वर्षी भारतानं परकीय गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढले. मागच्या वर्षी एफडीआयमध्ये 18 टक्के वाढ झाली आहे : पंतप्रधान
आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला 'मेक इन इंडिया'सोबत 'मेक फॉर वर्ल्ड' या मंत्रासह पुढे जायचं आहे : पंतप्रधान
देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेने ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलोय : पंतप्रधान
एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो : पंतप्रधान
आम्ही कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आणि त्यांच्याकडून तयार वस्तू पुन्हा विकत घेतो. हे कधीपर्यंत चालत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावंच लागेल : पंतप्रधान
वेदांमध्ये वसुधैव कुटुंबम सांगितलंय, तसंच विनोबा भावे म्हणत होते जय जगत. भारतानं विश्व हेच आपलं घर ही जोपासना कायम जोपासली आहे : पंतप्रधान
कोरोना संकटात 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण, मोदी म्हणाले देशाच्या वीर जवानांना सलाम
सर्व कोरोना वॉरिअर्सना मी नमन करतो. अनेकांनी प्राणही गमावले. मला विश्वास आहे की आपण विजयी होणारच : पंतप्रधान
कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युल्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक लोक 24 तास सातत्याने काम करत आहेत : पंतप्रधान
मेरे प्यारे देशवासियों... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांचं सातव्यांदा संबोधन
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलुंड पश्चिमेकडील मेहुल सर्कल जवळ अनोख्या पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मागील 4 महिने कोरोना युद्धात दिवस रात्र सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण मध्यरात्री 12 वाजता पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दरवर्षी 15 ऑगस्टला वेगवेगळ्या कलाकृती साकार करण्यासाठी मेहुल सर्कलजवळील ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स ठेवून ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस अधिकारी मुश्ताक खान, डॉ. एस. चंद्रशेखर, परिचारिका शिला गडवे, सफाई कामगार चितल आशया, चिटेला लिंगपा, वॉर्ड बॉय अर्जुन यांनी ध्वजारोहण केले. याठिकाणी अमर जवान स्मारक देखील उभारण्यात आले होते.यावेळी आम्ही ध्वजारोहणासाठी कोरोना योद्धाना बोलविले होते. गेले चार महिने ते कोरोनाशी लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आल्याचे आयोजक राजेश चव्हाण म्हणाले.

पार्श्वभूमी

आज देशाचा  74 वा स्वातंत्र्यदिवस. यंदा कोरोनामुळं सगळीकडं हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टंस राखत साजरा केला जात आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालकिल्ल्यावरील सोहळा देखील खबरदारी घेत साजरा होणा आहे.

दरम्यान 74 व्या स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. गलवान खोऱ्यात देशासाठी बलदान देणाऱ्या पराक्रमी जवानांना त्यांनी नमन केले. आपल्या सीमेचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी झटणारे सैन्य दल, पोलीस आणि निमलष्करी दलांचा आम्हाला अभिमान आहे.” असंही कोविंद यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनला कठोर शब्दात संदेश दिला. “जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं ते म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.