Independence Day: आज भारत स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 103 मिनिटांच्या भाषणात शेतकरी, महिला आणि तरुणांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की जर शत्रूंनी पुन्हा काही हालचाल केली तर सैन्य गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ. त्यांनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान विकासित भारत योजनेची सुरुवात करण्याची घोषणाही केली. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी मिशन सुदर्शन चक्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा असा प्रसंग आहे जेव्हा पंतप्रधान केवळ देशाच्या विकासाचा आणि सरकारच्या कामाचा लेखाजोखाच देत नाहीत तर देशाला भविष्यातील रोडमॅप देखील सादर करतात. आत्तापर्यंतच्या भाषणाचे नरेंद्र मोदींनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून 12 व्या वेळी देशाला संबोधित केले. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण देऊन स्वतःचाच विक्रम मोडला होता. मात्र यावेळी त्यांनी सर्व रेकॉर्ड तोडत 103 मिनीटांचं भाषण केलं आहे. गेल्या वेळी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 98 मिनिटांचे भाषण केले होते. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी 86 मिनिटांचे भाषण दिले आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वात लांब भाषणाचा विक्रम मोडला.

आतापर्यंत मोदींनी फक्त एकदाच तासापेक्षा कमी वेळ भाषण केलं

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून एकूण 12 वेळा राष्ट्राला संबोधित केले आहे. फक्त एकदाच त्यांनी एका तासापेक्षा कमी वेळ राष्ट्राला संबोधित केले. 2017 च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे भाषण फक्त 56 मिनिटे होते. हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण आहे.

लाल किल्ल्यावर मोदींची भाषणं आणि विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये प्रथमच लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केलं तेव्हा त्यांचं भाषण 65 मिनिटांचं होतं. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी 86 मिनिटांचं भाषण देत पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा 1947 मधील 72 मिनिटांचा विक्रम मोडला.

सर्वात लांब भाषण मोदींचं 2016 मध्ये झालं, जेव्हा देश आजादीची 70 वी वर्षगांठ साजरी करत होता, हे भाषण 94 मिनिटांचं होतं. याशिवाय, 2017 मध्ये 57 मिनिटं, 2018 मध्ये 82 मिनिटं, 2019 मध्ये 92 मिनिटं, 2020 मध्ये 86 मिनिटं, 2021 मध्ये 88 मिनिटं, 2022 मध्ये 83 मिनिटं आणि 2023 मध्ये 90 मिनिटांचं भाषण पंतप्रधानांनी केलं.

लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याचे विक्रम

जवाहरलाल नेहरू -  17 वेळा (1947-1964)इंदिरा गांधी -  16 वेळामनमोहन सिंग -  10 वेळानरेंद्र मोदी - 12 वेळाअटल बिहारी वाजपेयी -  6 वेळाराजीव गांधी व पी. व्ही. नरसिंह राव -  प्रत्येकी 5 वेळामोरारजी देसाई - 2 वेळाचौधरी चरण सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, एच. डी. देवगौडा, इंद्रकुमार गुजराल - प्रत्येकी 1 वेळा

ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याची संधीच मिळाली नाही

गुलजारीलाल नंदा - दोनदा 13 दिवसांचे कार्यवाहक पंतप्रधान, एकूण कार्यकाळ 26 दिवस.चंद्रशेखर - 1990-1991 कार्यकाळात एकदाही तिरंगा फडकवण्याची संधी नाही.