नवी दिल्ली: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला राजधानी दिल्लीत सर्व सुरक्षादलांना अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास 45 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहत. लाल किल्ल्या व्यतिरिक्त राजधानीतील सर्व प्रमुख बाजारपेठ, मॉल्स, आणि इतर गर्दीच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


 

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला तिसऱ्यांदा संबोधित करणार आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व लक्ष ठेवण्यासाठी अतिशय अधुनिक उपकरणे या परिसरात तैनात करण्यात आली असून, जवळपास 500 हाय रिझॉल्यूशनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

 

याशिवाय प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. मुगल स्मारक आणि त्याच्या आसपासच्या पाच किलोमीटरच्या परिसरात तब्बल नऊ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय सुरक्षा रक्षकांसोबत, अर्ध सैनिक बल आदींचाही समावेश आहे.

 

सुरक्षा अधिकाऱ्यांना सर्वा मुख्य बाजारपेठ, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बससेवा, दिल्ली मेट्रो आदी महत्त्वाच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.