Independence Day 2025 PM Modi Speech Live: तरुणांना 15 हजार, जीएसटी कमी करणार; पाकिस्तान-अमेरिकेला इशारा, आरएसएसला सलाम, नरेंद्र मोदींच्या भाषणातील A टू Z मुद्दे

Independence Day 2025 PM Modi Speech Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहे. नरेंद्र मोदी सलग बाराव्यांदा ध्वजारोहण करतील.

मुकेश चव्हाण Last Updated: 15 Aug 2025 03:18 PM

पार्श्वभूमी

Independence Day 2025 PM Modi Speech Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी...More

गडचिरोली पोलिसांच्या तिरंगा बाईक रॅलीतून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश 

गडचिरोली पोलिसांच्या तिरंगा बाईक रॅलीतून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश 


300 अधिकारी अंमलदारांचा तिरंगा बाईक रॅलीत सहभाग


गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांसह 300 अधिकारी, अंमलदार यांचा सहभाग होता. रॅलीच्या माध्यमातून देशसेवा, शौर्य आणि त्यागाचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. पोलीस मुख्यालयातून निघालेली ही बाईक रॅली गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक मार्ग पुन्हा मुख्यालयात विसर्जित करण्यात आली. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त शहिद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर नवजीवन वसाहत येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आत्मसमर्पित नक्षल सदस्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करत ध्वजारोहण करुन आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटुंबामध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले