Independence Day 2021 Live : पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा- मुख्यमंत्री

Independence Day 2021 Live : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन काय संबोधन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Aug 2021 09:35 AM
अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

अकोल्यात आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलंय. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहनाचा हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होतेय. यावेळी पालकमंत्र्यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आलीय. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेय. कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा केलेल्यांचा सत्कार यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय.

स्वातंत्र्य दिनानिमित्त साकारली राष्ट्रीय एकात्मता विषयावरील भव्य रांगोळी

भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील कलायोगी आर्ट्स च्या वतीने राष्ट्रीय एकात्मता विषयावरील 88 स्क्वेअर फुट आकारातील भव्य दिव्य रांगोळी साकारून रांगोळीच्या माध्यमातून सर्व भारतीयांना एका आगळ्या वेगळ्या प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ही रांगोळी तीन तासाच्या कालावधीत पंधरा किलो रंगीत रांगोळी चा वापर करत पूर्ण करण्यात आली. ह्या रांगोळीसाठी कलायोगी आर्ट्सचे संचालक राजकुमार कुंभार विद्यार्थी जय  पंडित, उषा वडतीले यांनी परिश्रम घेतले,


रांगोळी मध्ये भारत देशाचे भविष्य असलेला एक लहान मुलगा हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रकाशाच्या दिशेने भारताच्या प्रगतीचे एकेक पाऊल टाकत पुढे चालत आहे. हा मुलगा दुसरा कोणी नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे असे रांगोळीतून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. ही रांगोळी  स्वतंत्र भारताचे संविधान समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र असलेल्या भारताची ओळख दाखवणारी  कलाकृती आहे, असं कुंभार यांनी म्हटलंय

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आज 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदन करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला 


 

पालघरमध्ये ध्वजारोहण संपन्न

देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


 

जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

 अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
 अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिना निमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं...

 
सोलापुरात पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभरात आनंदोत्सव साजरा केला जातो. सोलापुरात जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांनी तंबाखूविरोधी शपथ घेतली. दरवर्षी ध्वजारोहणाला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ मोजकेच लोक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यदिन सोहळा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा





देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व जिल्हावासियांना पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभासाठी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वढाण, खासदार राजेंद्र गावित,,आमदार श्रीनिवास वणगा ,नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.


 

 



 


नांदेड : पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वाजता राष्ट्रध्वज वंदन करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला .राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ध्वजवंदन करून शासकीय  ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला . 

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला, यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा परिषद CO वंनमती सी, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रांधे, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित हे यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना अब्दुल सत्तार यांनी जिल्हावासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या

कोल्हापुरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

स्वातंत्र्य दिन आज सगळीकडं उत्साहात साजरा केला जातोय...कोल्हापुरात देखील मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला...कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालायासमोर झेंडा वंदन करण्यात आलं...यावेळी शाहू महाराज,  कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी मनोज लोहिया, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक शैलेंश बलकवडे, आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह माजी सैनिक, विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थीत होते.झेंडा वंदनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि नागरीकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या...यावेळी ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करण्यात आलं..कोल्हापुरातील पुरामध्ये बचाव कार्यात सक्रिय असणाऱ्या नागरिकांचे देखील आभार यावेळी सतेज पाटील यांनी मानले....

विभागीय आयुक्त कार्यालय आवारात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक -  विभागीय आयुक्त कार्यालय आवारात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण, 


- जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित

पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा.  नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असं ते म्हणाले. 

राज्यात साडेनऊ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण, स्वातंत्र्य दिनी अजून एक विक्रम, - स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह 

राज्यात साडेनऊ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण, स्वातंत्र्य दिनी अजून एक विक्रम, पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या...


- स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह 

स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेसतर्फे सोलापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन

75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेसतर्फे सोलापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. हातात मशाल घेऊन स्वतः आमदार प्रणिती शिंदे या रॅलीमध्ये सहभागी होत्या. सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त काँग्रेसच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. ज्याद्वारे विशेषता तरुणांना जागृत करण्याचे काम काँग्रेसद्वारे करण्यात येईल अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.

 काँग्रेसतर्फे सोलापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन

75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात आहे.  काँग्रेसतर्फे सोलापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. हातात मशाल घेऊन स्वतः आमदार प्रणिती शिंदे या रॅलीमध्ये सहभागी होत्या. सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त काँग्रेसच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. ज्याद्वारे विशेषता तरुणांना जागृत करण्याचे काम काँग्रेसद्वारे करण्यात येईल अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण

नागपूर : आज देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन... दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण होत आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा होत असून विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहणानंतर संघ मुख्यालयात सुरक्षेसाठी तैनात सीआयएसएफ आणि क्युआरटीचे जवान राष्ट्रीय ध्वजाला सलामी देतील.

कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देऊया, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्याचा, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मुल्यांची जपणूक करण्याचा, देशाचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार पुढे घेऊन जाण्याचा, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतच चालत राहण्याचा आपण सर्वजण पुन्हा एकदा दृढनिश्चय करुया,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना स्वातंत्र्याच्या 74व्या वर्धापनदिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. समस्त देशवासिय आज कोरोनापासून मुक्तीचा लढा मोठ्या निर्धारानं लढत आहेत. प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन आपणही कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देऊया... महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया... असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.  महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. देशावरील प्रत्येक संकटावेळी महाराष्ट्र मदतीसाठी, संरक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. इतिहासाची ही गौरवशाली परंपरा महाराष्ट्र कायम राखेल, हा विश्वास देतो. महाराष्ट्र आणि देश आज कोरोना संकटाशी लढत आहे. 75 वर्षांपूर्वी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा लढा निर्धाराने लढलो. सद्यस्थितीत कोरोनामुक्तीचा, कोरोनापासून स्वातंत्र्याचा लढा त्याच निर्धाराने लढायचा आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आपण कोरोनामुक्तीचा लढा निश्चितपणे जिंकू शकू, असा विश्वास करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना कोरोनामुक्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Independence Day 2021 : देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा!

Independence Day 2021 : देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशेष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी ट्वीट करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की,  आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद! 

पार्श्वभूमी

Independence Day 2021 Live : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासहित इतर 32 खेळाडूंना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. Independence Day 2021 Live : देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर सकाळी 7.18 मिनीटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचतील. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित असतील. 


त्यानंतर पंतप्रधानांना लष्कराच्या तीनही दलांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. या दरम्यान, दिल्ली पोलिसांची एक तुकडीही या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. या मानवंदनेनंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि तिरंगा फडकावतील. यावेळी राष्ट्रगीताची धुन वाजवण्याची जबाबदारी इंटर-सर्व्हिस ब्रॅन्डकडे असेल. 


ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी लष्कराकडून 21 तोफेंची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर लष्कराच्या वेगवेगळ्या तुकड्या आणि दिल्ली पोलिसांच्या तुकडीच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी भारतीय वायुदलाच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.  


सुरक्षेचे कडक उपाय
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन भारतीय पंतप्रधानांचे करण्यात येणारे संबोधन लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनरच्या इमारतींच्या माध्यमातून 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' हा संदेश देण्यात येणार असून देशाच्या सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि राष्ट्राशी संबंधित इतर पेंटिंगही त्यावर दिसून येणार आहेत. 


सुरक्षेच्या कारणास्तवर उभारण्यात येणाऱ्या या कंटेनरच्या इमारतींवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा दिसणार आहेत. या कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.