UP News : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या काही निकटवर्तींयासह समाजवादी पार्टीच्या काही प्रवक्त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाने ही कारवाई केली असून यामध्ये मनोज यादव, जैनेंद्र यादव, सपा प्रवक्ते राजीव राय यांचा समावेश आहे. आयकर विभागाने ही कारवाई लखनऊशिवाय मैनपुरी, आग्रा आणि मऊ याठिकाणीही केली आहे. सपा प्रवक्ते राजीव राय यांनी या कारवाईनंतर आक्रमक प्रतिक्रिया देत द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे.


कुठे-कुठे टाकले आयकर विभागाने छापे


मैनपुरीमध्ये राहणारे मनोज यादव हे अखिलेश यादव यांच्या जवळचे व्यक्ती आहेत. तसंच ते आरसीएल ग्रुपचे मालक आहेत. शहराच्या कोतवालीमध्ये मोहल्ला बंशीगोहरा येथे राहणारे मनोज यादव यांच्या घरी आयकर विभाग 12 गाड्यांचा ताफा घेऊन आयकर अधिकारी पोहोचले होते. त्यावेळी घरच्या सुऱक्षारक्षकांनी त्यांना आत जाण्यातस मनाई केली होती. दरम्यान बराच वेळ आयकर विभागाचे अधिकारी घरातील लोकांची चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे लखनऊ येथे अखिलेश यादव यांचे दुसरे निकवटवर्तीय जैनेंद्र यादव ऊर्फ नीटू सहित यांच्याही घरी छापेमारी करण्यात आली. जैनेंद्र यांच घर लखनऊच्या आंबेडकर पार्क याठिकाणी असून टॅक्स चोरीच्या आरोपाखाली आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे.


'राजकीय द्वेषातून ही कारवाई'


समाजवादी पार्टीचे प्रवक्ता राजीव राय यांच्या मऊ येथील घरावर आयकर विभागाने छापेमारी केली असून त्यानंतर राय यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. राजकीय द्वेषातून ही कारवाई करण्यात आल्याचं राजीव यांनी म्हटलं ते म्हणाले,''माझं काही क्रिमीनल रेकॉर्ड नाही, मी अनेक गरजूंची मदत करत असतो. हीच गोष्ट सरकारला आवडत नाही म्हणूनच राजकीय द्वेषातून ही कारवाई करण्यात आली आहे.''


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha