करमाळी : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली तेजस ट्रेन काल गोवाच्या करमाळी स्टेशनला रात्री साडेबारा वाजता पोहचली. अवघ्या आठ तासामध्ये तेजसने सीएसटी ते करमाळीचं अंतर पार केलं.


रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर काल संध्याकाळी साडे चार वाजता ही ट्रेन मुंबई सीएसटीहून गोव्याच्या दिशनं निघाली होती. साडे आठ तासात तेजस एक्स्प्रेस करमाळीमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. पण तेजसनं हे अंतर अवघ्या 8 तासामध्ये पार केलं आहे.

दरम्यान, बुधवारपासून या गाडीची नियमित सेवा सुरु होणार आहे. ही ट्रेन मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाच दिवस धावणार आहे, असून ती पहाटे पाच वाजता सीएसटीवरुन सुटेल, आणि करमाळीत दुपारी 1.30 वाजता दाखल होईल.

तर परतीच्या प्रवासासाठी  ही गाडी दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी दुपारी 2.30 वाजता करमाळीहून सुटले. आणि सीएसएमटीमध्ये रात्री 11 वाजता पोहचेल.

पावसाळ्यात ही ट्रेन तीन दिवसच धावणार आहे. पावसाळ्यामध्ये दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सीएसएमटी येथून पहाटे 5 वाजता ही गाडी सुटून दुपारी 3.30 वाजता करमाळीत दाखल होईल. तर परतीच्या प्रवासात सकाळी 7.30 वाजता दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी करमाळी स्थानकातून सुटून संध्याकाळी 7.45 वाजता सीएसएमटीमध्ये दाखल होईल.

दरम्यान, रेल्वेनं या गाडीचं मेन्यूकार्ड आणि दरपत्रकही प्रसिद्ध केलं असून, नाश्तासाठी तुम्हाला 122 ते 155 रुपये तर जेवणासाठी 222 ते 244 रुपये मोजावे लागतील.

संबंधित बातम्या

हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट


केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा… हायटेक ‘तेजस’ सज्ज!


मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!