नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेवटचे भाषण केले. या भाषणात त्यांनी गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संरक्षण विभागांतीव व्यवहारांबाबत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप केले.
1. आगामी निवडणुकासांठी सर्व विरोधकांना शुभेच्छा, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचं स्वागत
2. आम्ही जगाला मेक इन इंडियाची ताकद दाखवली, त्यामुळे भारत हा जगातला दूसरा सर्वात मोठा स्टील प्रोड्यूसर झाला आहे
3. भारत आता जगातला चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर झाला आहे. हे मेक इन इंडियाचं यश आहे
4. मेक इन इंडियामुळे जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात उपलब्ध आहे, त्यामुळे जगात इंटरनेटचा सर्वाधिक वापर भारतात केला जात आहे
5. काँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, काँग्रेकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, काँग्रेसकडून योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते
6. काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंडांची उपमा दिली, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले
7. देशवासियांनी न्यायसंस्थेवर विश्वास ठेवावा, आपला निवडणूक आयोग जगासाठी उत्तम उदाहरण आहे आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा
8. गेल्या साडेचार वर्षात आम्ही देशभरात 13 कोटी गॅस कनेक्शन दिले, उज्वला योजना 6 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचली
9. काँग्रेसने 55 वर्षात 50 टक्के लोकांची बँक खाती उघडली, आम्ही 5 वर्षात 100 टक्के लोकांना बँक खाती उघडून दिली
10. जेव्हा महाभेसळ (महागठबंधन)असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते, आमचं सरकार बहुमत असलेलं सरकार आहे, त्यामुळे आमचे सरकार देशवासियांसाठी आहे
11. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली
12. जब कभी झूठ की बस्ती में सच को तडपते देखा है| तब मैने अपने भीतर किसी बच्चे को सिसकते देखा है| माझी अवस्था सध्या या कवितेसारखी झाली आहे
13. काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत, 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले
14. देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा, काँग्रेसने जवानांना कमजोर केलं
15. काँग्रेसमुक्त भारत ही माझी घोषणा नाही, मी तर महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करत आहे
16. नोटबंदीमुळे बेनामी कंपन्यांचा पर्दाफाश झाला, 3 लाख बेनामी कंपन्या बंद पडल्या, बेनामी संत्तीची प्रकरणं समोर आली, अजूनही अशी प्रकरणं समोर येत आहेत
17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये सहभाही होणे म्हणजे आत्महत्येसमान आहे
18. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं तेव्हा महागाई होती, परंतु गेल्या साडेचार वर्षांपासून महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे, मध्यमवर्गीयांना आमच्या सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला
19. जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या, 99 टक्के वस्तूंवर 18 टक्यांपेक्षा कमी जीएसटी आहे
20. दुधावर कर लावणाऱ्या काँग्रेसने जीएसटीबाबत बोलू नये, जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या आहेत
21. गेल्या 100 दिवसांत 11 लाख लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला आहे, 100 रुपयांचं औषध आता केवळ 30 रुपयांत उपलब्ध आहे
निवडणुकीपूर्वी लोकसभेतल्या मोदींच्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2019 09:14 PM (IST)
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेवटचे भाषण केले. या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -