IMD Weather Update : राज्यासह देशभरात पुन्हा मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. राजधानि दिल्लीत आज (21 ऑगस्ट रोजी) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अपडेटनुसार, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 


उत्तराखंडमध्ये पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.






उत्तर प्रदेश-हरियाणात पावसाची स्थिती कशी आहे? 


उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 20 ऑगस्ट रोजी राज्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यामुळे दिवसभर नागरिकांना दमट उन्हाचा सामना करावा लागला. हरियाणामध्येही पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 22 ऑगस्टपर्यंत पावसाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.


मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात


मध्य प्रदेशातही पावसाची संततधार सुरू आहे. रविवार, 20 ऑगस्टपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा कालावधी असेल. याबरोबरच ग्वाल्हेरसह झोनमधील इतर जिल्ह्यांमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. राज्यातील जोधपूर, बिकानेर, झालावाड, पालीसह अनेक भागात विजांच्या कडकडाटांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तेलंगणा, मराठवाडा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Petrol-Diesel Price: तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? जरा थांबा, आजचे दर जाणून घ्या!