JEE (Advanced) 2021 Results : JEE अॅडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाली आहे. मृदूल अग्रवाल देशात पहिला आला आहे. तर मुलींमधून काव्या चोप्राची बाजी मारली आहे.  JEE Advanced 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला असून टॉपर्स लिस्ट देखील जारी केली आहे. जयपूरच्या मृदुल अग्रवालनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोबतच त्यानं  IIT-JEE प्रवेश परीक्षेत आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम देखील केला आहे. या परीक्षेत मृदूलनं 360 पैकी 348 गुण मिळवले. त्याची टक्केवारी 96.66 इतकी आहे. 2011 नंतर हे कुठल्याही विद्यार्थ्याने मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत.

  


निकालात देशभरातून 41, 862 विद्यार्थी क्वालिफाय झाले. देशातून जयपूरच्या मृदुल अग्रवाल हा पहिला आला असून मुलींमध्ये दिल्ली झोन मधून काव्या चोप्रा या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आलाय. मुंबईत सुद्धा कार्तिक नायर हा विद्यार्थी देशातून 7 वा आणि राज्यातून पहिला आहे तर निरिजा पाटील ही मुंबई झोन मुलींमध्ये टॉपर आली आहे 

नुकतंच नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)कडून जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर (JEE Main 2021)च्या पेपर 2 चा निकाल जाहीर केला आहे. आता JEE अॅडवान्सचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आपला निकाल  jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करु शकतात. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे.  जवळपास 60000 विद्यार्थ्यांसाठी JEE मेन BArch आणि BPlanning चे निकाल घोषित केले आहे.  एनटीएकडून बीटेकचे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत. 


JEE अॅडवान्स 2021 निकाल असा तपासा
सर्वात आधी अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in  वर जा.
होमपेज वर असलेल्या लिंकवर क्लिक करा.
स्क्रीनवर नवीन लॉगिन विंडो दिसेल
त्यात अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सेक्युरिटी पिन टाका 
'सबमिट' वर क्लिक करा
JEE अॅडवान्स निकाल 2021 पेपर 2 आपल्या स्क्रिनवर दिसेल
निकाल चेक करा आणि डाऊनलोड करा. 
भविष्यात संदर्भासाठी त्याची एक प्रिंटआऊट अवश्य काढा 




 



चार टप्प्यांत परीक्षेचं आयोजन 


यावर्षीपासून संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळू शकेल. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता.पुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये पार पडणार होत्या. परंतु, देशात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसरा टप्पा 20-25 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तर चौथा टप्पा 26  ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI