नवी दिल्ली : आज आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच ICSE बोर्डाने यावेळी टॉपर्सची यादी जाहीर केली नाही. तसंच निकाल जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष पत्रकार परिषद सोडाच व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली नाही.


विद्यार्थी त्यांचा निकाल cise.org या संकेतस्थळावर क्लिक करुन पाहू शकतात. तिथे त्यांना त्यांचा परीक्षार्थी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर ते एका क्लिकवर त्यांचा निकाल पाहू शकतात. ICSE बोर्डाने यासंदर्भात cise.org या वेबसाइटवर अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये निकाल जाहीर करण्याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे.


किती मुलांनी परीक्षा दिली होती?
ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला 2 लाख 7 हजार 902 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 1 लाख 12 हजार 668 मुलं होती. तर 95 हजार 234 मुली होत्या. यापैकी 2 लाख 6 हजार 525 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 1377 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला 88 हजार 409 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 47 हजार 429 मुलांचा समावेश होता. तर 40 हजार 980 मुलींचा समावेश होता. यापैकी 85 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 2798 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.


SSC, HSC Results | दहावी, बारावी निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती


कसा बघायचा निकाल
ICSE चा निकाल आज दुपारी 3 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. त्यासाठी https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.cisce.org/ जा
तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा
त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा
Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल
इथे थेट तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत : वर्षा गायकवाड