नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे संसदही चिंतेत असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.

राज्यसभेतही हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी आज राज्यसभेत आवाज उठवला. बच्चन म्हणाल्या की, शासन सुरक्षा प्रदान करण्यात सक्षम नसेल तर गुन्हेगारांचा फैसला जनतेला करु द्या. त्या नराधमांना जनतेच्या ताब्यात द्यायला हवे. त्यांना लोकांसमोर ठेचून मारलं पाहिजे.

दरम्यान, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीदेखील याप्रकरणावर त्यांचे मत व्यक्त केले. केवळ कायदे बनवून काही होणार नसून नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचेही आझाद म्हणाले.

आझाद म्हणाले की, आपण आतापर्यंत अनेक कायदे बनवले, परंतु कधी-कधी केवळ कायदे बनवून समस्या सुटत नाही. या रोगाला मुळासकट नष्ट करायला हवे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले की, देशाच्या कोणत्याही राज्यात अशी घटना घडली तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी. अशा घटनेची देशातील कोणत्याही राज्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संसद चिंतेत आहे. अशा घटना रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदे बनवायला हवेत.

दरम्यान,