Jubilee Hills gangrape case :  हैदराबादमधील ज्युबली हिल्स सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख उघड केल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार रघुनंदन राव  ( Raghunandan Rao) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुबली हिल्स येथील 17 वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकणातील पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोप राव यांच्यावर आहे. अल्पवयीन पीडितेचे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध केल्याप्रकरणी राव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 228A (पीडित व्यक्तीची ओळख उघड करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 या प्रकणातील तक्रारदाराने आरोप केला आहे की, 4 जून रोजी तेलंगणा राज्यातील दुबक मतदारसंघाचे आमदार माधवनेनी रघुनंदन राव यांनी भाजप प्रदेश कार्यालय, कट्टेलमंडी येथे एका किशोरवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराबाबत पत्रकार परिषद घेतली. रघुनंदन राव यांनी यावेळी या घटनेशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडीओ मीडियामध्ये प्रसिद्ध केले. त्यामुळे अल्पवयीन पीडितेची ओळख उघड झाली.  


राव यांनी प्रसिद्ध व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर तो अनेकांनी शेअर केला आहे. दरम्यान, ही व्हिडीओ क्लिप दाखवल्याबद्दल दोन यूट्यूबर्सवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय संबंधांचा विचार न करता रघुनंदन राव यांनी राजकीय फायद्यासाठी पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात आहे.


दरम्यान, हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणात एका मेजरसह पाचही अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हैदराबाद शहराचे सीपी सीव्ही आनंद यांनी ही माहिती दिली. सादुद्दीन मलिक हा या प्रकरणातील मुख्य व्यक्ती असल्याचे त्यांने सांगितले. या प्रकरणातील आरोपींपैकी चार अल्पवयीन मुलांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित एका अल्पवयीन आरोपीला आज हजर करण्यात येणार आहे. 


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.