Hyderabad Gang Rape Case : हैदराबादमधील सामुहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच आरोपी अल्पवयीन असून एक आरोपी प्रोढ आहे. यामधील एक आरोपी AIMIM आमदाराचा मुलगा आहे. या आरोपींवर पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा आमदार रघुनंदन राव (Raghunandan Rao) यांनी गेल्या आठवड्यात पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपींचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यांनी आरोप केला होता की, एका आमदाराचा मुलगा पीडित मुलीसोबत कारमध्ये होता. त्यांनी पोलीस हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला.
घरी सोडण्याच्या बहाण्यानं मुलीला गाडीत बसवलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींनी पीडित मुलीला पार्टीनंतर घरी सोडतो सांगून गाडीत बसवलं. त्यानंतर आरोपींनी शहरातील उच्चभ्रू वस्ती ज्युबली हिल्स येथे कार पार्क केली आणि मुलीवर अत्याचार केला. यावेळी आरोपी इतर गाडीबाहेर पहारा देत होते. घरी आल्यावर मुलीच्या वडिलांनी तिच्या मानेवर दुखापतीच्या खुणा पाहिल्या आणि त्याबद्दल विचारणा केली असते. तेव्हा पीडितेनं सांगितलं की पबमध्ये पार्टी केल्यानंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केला. यावरून मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीडितेच्या संपूर्ण जबाब नोंदवल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
सुरुवातीला पोलिसांनी आमदाराचा मुलगा गाडीत नसल्याचे सांगितलं
हैदराबाद पोलिसांनी सुरुवातीला आमदाराचा मुलगा गाडीत नसल्याचं आणि तो अत्याचारात सामील नसल्याचं सांगितलं होतं. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित मुलगी संशयित आरोपींसोबत पबबाहेर उभी असलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. या आमदाराच्या मुलाला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांपैकी एक आरोपी राज्यातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीच्या (TRS) स्थानिक नेत्याचा मुलगा आहे. दुसरा अल्पवयीन, या भागातील एका राजकारण्याचा मुलगा आहे. ज्या इनोव्हा कारमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे ती कार मंगळवारी फार्महाऊसमधून जप्त करण्यात आली. ही कार राजकारण्याच्या नावावर नोंदणी झालेली आहे.
काय आहे प्रकरण?
हैदराबादमध्ये 28 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत. तीन अल्पवयीन आणि एका आरोपीला अटक करण्यात आली असून पाचव्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Gyanvapi Row : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायधीशांना धमकीचं पत्र
- Moose Wala Murder : 10 दिवस... 8 जण कैद; कसा रचला सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट?
- Monsoon Update : 15 जूनपासून मान्सून वेग पकडणार, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.