बरेली : लग्नानंतर त्याने विधीनुसार नववधूच्या डोक्यावरचा पदर उचलला. पण त्यानंतर तो अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या सौंदर्याने घायाळ झाल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला नव्हता. पदर उचलताच आपली पत्नी ही स्त्री नसून एक किन्नर असल्याचं लक्षात झाल्याने नवरदेवावर डोक्याला हात मारुन घेण्याची वेळ आली.

 
ही बातमी वाचताना तुम्हाला कदाचित हसू येईल, मात्र बरेलीत राहणाऱ्या वराला मोठा धक्का बसला आहे. नवरदेवासोबतच त्याच्या घरच्यांच्या स्वप्नांनाही सुरुंग लागला. महेशपूर अटरियामध्ये राहणाऱ्या हरिओमचा विवाह मढिनाथच्या युवतीशी ठरला. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि तिला पाहून नवरदेवाने होकार दिला. 28 एप्रिलला दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.

 
कसं उघड झालं प्रकरण ?

लग्नाचे विधी आटोपल्यानंतर 'सुहागरात'ची वेळ झाली. अत्यंत उत्साहाने नवरा खोलीत गेला. डोक्यावर पदर घेऊन बसलेल्या पत्नीचा पदर त्याने उचलला. पण समोरचं दृश्य पाहून तो अवाक झाला. त्याने घरातल्या सदस्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि हलकल्लोळ माजला.

 
कुटुंबीय तात्काळ नववधूला घेऊन डॉक्टरांकडे गेले आणि तिथे डॉक्टरांनी पत्नीला किन्नर घोषित केलं. त्यानंतर नववधूला माहेरी धाडण्यात आलं पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत असून पुढे काय होणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता कायम आहे.